सोमवार, २० एप्रिल, २०१५

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

    
O छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे ?
उत्तर -------- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
२] छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला ?
उत्तर ------ फाल्गुन वद्य तृतीया, फेब्रुवारी १९, १६३०
३] छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर --------- शिवनेरी किल्ला, पुणे
४] छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला ?
उत्तर ---------चैत्र पौर्णिमा, एप्रिल ३, १६८०
५] छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणती राजधानी आहे असे मानले जात ?
उत्तर -------- रायगड
६] छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?
उत्तर ----- ज्येष्ट शुध्द त्रयोदशी , जून ६, १६७४
७] छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकारकाळ कोणता होता ?
उत्तर -------- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
८] छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तराधिकारी कोण होते ?
उत्तर -------- छत्रपती संभाजीराजे भोसले
९] छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई नाव काय ?
उत्तर ------ जिजाबाई
१०] छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या ?
उत्तर ----- आठ
११] छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजघराणे कोणते होते ?
उत्तर --------- भोसले, सिसोदिया(भोसावत)
१२] छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजब्रीदवाक्य काय होते ?
उत्तर ---------- 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
१३] छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील त्यांचे चलन काय होते ?
उत्तर --------- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन )
१४] शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक .................म्हणून कार्यरत होते ?
उत्तर ----------सरदार
१५]
१)छत्रपती शिवाजी महाराज हे स्वताचे आद्यगुरु म्हणून कोणाला मानत ?
२) .......................हे शिवरायांचे गुरु व् मार्गदर्शक संत होते!
उत्तर --------
१) जिजाबाईंनी
२) संत तुकाराम/ संत रामदास स्वामी
१६] छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेत मावळे म्हणजे कोण ?
उत्तर ------ दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्यातील अठरा पगड़ जाती जमतींच्या हिन्दू मुस्लिम सैनिकांना "मावळे" म्हणायचे .
१७] शिवाजी महाराजांचे सरसेनापती कोण होते ?
उत्तर ------ नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
१८] छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली पहिली स्वारी किती वर्षाचे असताना केली ?
उत्तर ----- १७ वर्ष
१९] छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली पहिली स्वारी करून कोणता गड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.?
उत्तर ------ तोरणगड
२०] छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून केव्हा जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
उत्तर ------- इ.स. १६४७ मधे १७ वर्षाचे असताना ...
२१] आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी .................... साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
उत्तर -------- इ.स. १६५६
२२] आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे ..................साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला ?
उत्तर ---------- इ.स. १६५९
२३] छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानच्या सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळे कोणती म्हण प्रचिलित झाली ?
उत्तर -------- "होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी"
२४] अफझलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर कोठे बांधली ?
उत्तर -------- प्रतापगडावर
२५] शिवाजी राजेंच्या मृत्यु कोठे झाला
उत्तर--------शिवतीर्थ रायगड
२६] सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक ................ यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्यावर पोवाडा लिहिला .
उत्तर ---------- महात्मा ज्योतिबा फुले
२६]  शिवजयंती ---------- यांनी सुरु केली.
उत्तर-------- लोकमान्य टिळक
२७] शिवाजी महाराज हे ------धर्माचे होते
उत्तर----- हिंदू
२८] शिवरायांनंतर कोणी हिंदूचे रक्षण केले.
उत्तर----- धर्मवीर छत्रपति शंभूराजांनी
जय शिवराय
जय शंभूराजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा