शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

छत्रपती संभाजी महाराज

आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष...
!! १६ जानेवारी १६८१ !!
!! हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील
सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक दिवस.
कारण याच दिवशी स्वराज्याचे दुसरे
छत्रपती आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज
भोसले यांचे पुत्र, तसेच राजमाता जिजाऊसाहेब
भोसले यांचे लाडके नातू,
थोरल्या महाराणी सईबाईसाहेब भोसले यांचे
चिरंजीव धर्मवीर संभाजीराजे भोसले
यांचा राज्याभिषेक दिन............... !!
!! जगातील पहिले बुलेटप्रुफ जाकीट युद्ध
भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात
तयार करणारे, जगातील
पहिला तरंगता तोफखाना तयार करणारे,
जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे
मीटरचा सेतू बांधणारे,
आदिलशाही आणि कुतुबशाहीची एकजूट करणारे
आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व
इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारे,
त्याचवेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेले,
दुष्काळग्रस्त
गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून
डोंगर पोखरून जल नियोजन करणारे,
उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक
आणि राजस्थान प्रांतातील
लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्रित करणारे,
इतर धर्मांचा मान सन्मान करणारे,धर्मांतरावर
बंदी घालणारे, बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्ध
कायदा करणारे, शिवप्रभुंची इच्छा पूर्ण
करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर
पंधराव्या दिवशी दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरवर
छापा घालणारे, स्वराज्याला आर्थिक संपन्न
ठेवणारे, देहू ते पंढरपूर आषाढवारीला संरक्षण व अर्थ
पुरवठा करणारे, दुष्काळग्रस्त
शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज
योजना राबविणारे,
सैनिकांच्या उत्पन्नाला हातभार
लागावा म्हणून चराईची सवलत काय ठेवणारे,
आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून
तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारे,
स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून
स्वदेशीचा महामंत्र देणारे आणि सगळ्यात
महत्वाचे म्हणजे दिल्ली सम्राट औरंगजेब
याला त्याच्या शाही तख्तापासून २७ वर्षे दूर
ठेवून स्वराज्याच्या मातीत
मरायला लावण्याचा भीम पराक्रम करणारे
आमचे स्वराज्याचे धाकलं धनी, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज
यांचा हा राज्याभिषेक दिन !!
!! धर्मशास्त्रपंडित ज्ञानकोविंद
न्यायनीतीशास्त्रपारंगत रणधुरंधर बुधभूषणकार
सर्जा नृपशंभो धर्मवीर प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराजमहाराज श्रीमंत
श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा